डॉ. उमाकांत पाटील यांची ‘ब्रेन पूल फेलो’ म्हणून निवड

डॉ. उमाकांत पाटील यांची ‘ब्रेन पूल फेलो’ म्हणून निवड

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधक व सहयोगी प्राध्यापक डॉ. उमाकांत पाटील यांची कोरियन राष्ट्रीय संशोधन फाऊंडेशनकडून ‘ब्रेन पूल फेलो’ म्हणून निवड झाली आहे.

या फेलोशीपच्या माध्यमातून त्यांना दक्षिण कोरियातील योन्सेई युनिव्हर्सिटीमध्ये ऊर्जा साठवणुकीवर संशोधन करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या संशोधनातून ऊर्जा साठवणुकीसाठी लागणारे अधिक क्षमतेचे नवीन घटक बनवण्यात येतील डॉ. पाटील हे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च’मध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

शिवाजी विद्यापीठातून त्यांनी प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्र (पदार्थ विज्ञान) विषयामध्ये पीएच. डी. केली. गेली १३ वर्षे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्चस्तरीय संशोधन करत असताना आतापर्यंत त्यांनी १०० शोधनिबंध १० पेटंट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध केले आहेत.

या निवडीसाठी संस्थेचे अध्यक्ष व कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, रजिस्ट्रार डॉ. व्ही. व्ही. भोसले, वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी यांनी शुभेच्छा दिल्या.