आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार संशोधक प्रा डॉ चंद्रकांत लोखंडे याना जाहीर

आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे फिजिक्स विषयाचे विभाग प्रमुख म्हणून ज्यांनी यशस्वी काम पाहिले आहे आणि डॉ डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर येथे डिन व रिसर्च डायरेक्टर म्हणून देखील जे कार्यरत राहिले आहेत असे जेष्ठ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक प्रा डॉ चंद्रकांत लोखंडे याना जाहीर झाला असल्याचे प्रतिष्ठान च्या वतीने उपाध्यक्ष डॉ गुजर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले

आतापर्यंत सदर प्रतिष्ठानच्या वतीने जेष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, कु नसीमा हुरजूक, डॉ प्रकाश आमटे, शा बं मुजुमदार, डॉ अभय बंग, डॉ जब्बार पटेल, डॉ रणजित जगताप, प्रा डॉ शिवाजीराव कदम, याना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे दरम्यान,17 सप्टेंबर ला या पुरस्काराचे सन्मान पूर्वक वितरण करण्यात येणार आहे असेही प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ गुजर यांनी यावेळी सांगितले